ख्यातनाम इतिहास संशोधक कै| गणेश हरी खरे यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे सहा खंड प्रसिद्ध केले| शेवटचा सहावा खंड १९७३ साली प्रकाशित झाला| त्यानंतर ३४ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऐतिहासिक फार्सी साहित्याचे हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे| हे पुस्तक विजापूरच्या आदिलशाही फर्मानांचे आहे| महाराष्ट्राच्या बहुअंशी भूभागावर आदिलशाही राजवट होती| आदिलशाहांची धोरणे आणि आदिलशाही राज्यकारभार यांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे| या पुस्तकात फार्सी फर्मानांची प्रतिरूपे दिलेली आहेत| त्याचबरोबर ओळवार फार्सी संहिता, मराठी सारांश आणि टीपा दिलेल्या आहेत| मध्ययुगीन भारताच्या तसेच विशेषतः आदिलशाही फर्मानांच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी ठरेल|
Aadilshahi Farmane
ISBN: 818995945X
ISBN 13: 9788189959456
Publication Date: 2007
Publisher: Diamond Publications
Pages: 208
Format: Paperback
Authors: Gajanan Bhaskar Mehendale, Ninad Bedekar, Ravindra Lonkar